Ad will apear here
Next
बंड्या बोर्डात आला!
वाचनाची फारशी आवड नसणारे विनोद मात्र आवडीने वाचत, ऐकत किंवा सांगत असतात. विनोदी कथांनाही मोठा वाचकवर्ग आहे. सुनील पांडे यांच्या ‘बंड्या बोर्डात आला!’ या संग्रहातील कथा वाचून चेहऱ्यावर हास्य उमटते. या छोटेखानी कथांमधून विनोद तर आहेच; शिवाय त्यातून एक वेगळा संदेशही मिळतो. ‘बंड्या बोर्डात आला’ या कथेत बंड्याचे घर, गाव बंड्याच्या कौतुकात बुडालेले असताना बंड्या मात्र शांत असतो. त्याचे ‘बोर्डात येण्या’चे गुपित नंतर वाचकांना कळते. ‘केळीची साल’मध्ये रस्त्यावर पडलेली केळीची साल आणि त्यावरून घसरून पडलेले श्यामराव या छोट्या घटनेचा धागा अगदी दहशतवाद्यांपर्यंत नेला जातो. ‘एका लेखकाची गोष्ट’मधून त्याच्या लोकप्रिय (?) साहित्याच्या रद्दीची कहाणी वाचायला मिळते. मुलाने शिक्षणाच्या मागे न जाता राजकारणाचा वारसा चालवावा, अशी इच्छा असणारे सरपंच रंगराव पाटील शाळाच बंद करायला निघतात. त्यांच्या या घोषणेचा प्रवास शिपायापासून शाळेच्या संस्थाचालकापर्यंत कसा होतो आणि हे संकट इष्टापत्ती कसे वाटते, याची ही मजेदार गोष्ट आहे. अशा हसवणाऱ्या ३३ कथा या पुस्तकात आहेत.

पुस्तक : बंड्या बोर्डात आला!
लेखक : सुनील पांडे
प्रकाशन : स्नेहवर्धन प्रकाशन
पृष्ठे : १०४
मूल्य : १२० रुपये

(‘बंड्या बोर्डात आला!’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZOSCC
Similar Posts
भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी सुनील पांडे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी सुनील पांडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष विजय चौधरी आणि विकास रासकर यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
डॉ. मधुरा कोरान्ने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे : स्नेहवर्धन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. मधुरा कोरान्ने लिखित ‘न्यायालय आणि मराठी नाटक’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले.
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language